Advertisement
ब्रेकिंग

राशीन येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून पेवर ब्लॉक साठी १० लाखाचा निधी मंजूर भूमिपूजन कामाचा शुभारंभ.

Samrudhakarjat
4 1 1 5 5 8


राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी  :- नाशिक पदवीधर मतदारसंघातचे कार्यक्षम आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या निधीतून राशीन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री जगदंबा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला असून या भूमिपूजन कामाचा शुभारंभ राशीनच्या लोकाभिमुख सरपंच सौ. नीलम भीमराव साळवे व उपसरपंच शंकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, अविनाश मासाळ, औदुंबर देवगावकर माजी ग्रामपंचायत सदस्यअंबादास दळवी, पराग अच्छा, मिलिंद मासाळ, दिलीप साळवे, बापू धोंडे, युवराज काळे, नवनाथ काळे, गजानन ढानके, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपसरपंच शंकर देशमुख यांनी आमदार सत्यजित तांबे साहेबांकडे वेळोवेळी पाठपुरावा व मागणी केल्याप्रमाणे आमदार साहेबांनी अल्पशा काळात पेवर ब्लॉक बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शंकर देशमुख यांनी सत्यजित तांबे साहेबांचे राशीन ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करीत आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker