रयत ऑलिंपियाड स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयाला सुवर्णपदके

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रयत ऑललिंपियाड स्पर्धेमध्ये १० सुवर्णपदके मिळाली आहेत. अकरावी सायन्स मधील १७ विद्यार्थी, ११ वी गणित मधील १४, बारावी सायन्स १८, बारावी गणित ५ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते
या परीक्षेमध्ये अकरावी सायन्स मधील शुभम सतीश समुद्र, दीक्षा नानासाहेब जाधव, श्रुती सचिन जगताप, बारावी सायन्स मधील प्रशांत राजेश सुथार, साक्षी शशिकांत वाघ, शुभदा जरांडे, अकरावी गणित मधील शुभम सतीश समुद्र, गीतांजली राऊत, वैष्णवी नवनाथ गव्हाणे, बारावी गणित मधील प्रशांत राजेश सुथार या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाली आहेत. प्रशांत राजेश सुथार हा विद्यार्थी रयत ऑललिंपियाडच्या दुसऱ्या लेव्हलला पात्र ठरला आहे.
सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना सायन्स विभागातील प्रा. सुनील देशमुख, प्रा. जयदीप खेतमाळीस, प्रा. संग्राम राक्षे व गणित विभागामधील प्रा. प्रवीण घालमे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.