कवयित्री स्वाती पाटील यांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

कर्जत (प्रतिनिधी) :- कवयित्री स्वाती पाटील यांच्या वतीने कर्जत येथे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार भरत वेदपाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष माळवे, कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप यांच्यासह गणेश जेवरे, आशिष बोरा, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, मुन्ना पठाण, निलेश दिवटे, नगरसेवक तथा संपादक भाऊसाहेब तोरडमल, अस्लम पठाण,दादा शिंदे, दिलीप अनारसे यांचा शाल, पेन व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात स्वाती पाटील यांनी कवयित्री म्हणून माझी ओळख निर्माण करण्यात कर्जत तालुक्यातील पत्रकारांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. भरत वेदपाठक यांनी कर्जत तालुक्यातील पत्रकारांच्या वाटचालीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी शबनम मुंढे, माधुरी गोंदकर या उपस्थित होत्या.