मैलामिश्रीत दुर्गंधी सांडपाण्याची विल्हे वाट लावावी तसेच रोग प्रतिबंधक फवारणी करणेबाबत राशीन ग्रामपंचायतला निवेदनद्वारे मागणी.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी.:- राशीन परिसरात सध्या डेंगू, मलेरिया टायफड, इतर आजारराचे प्रमाण जोमाने वाढत असून दिवसेंदिवस डेंगू व इतर रुग्णात वाढ होताना दिसत आहे. गावाच्या सार्वजनिक ओड्याकडे तसेच स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील वर्षभरापासून मैलामिश्रित दुर्गंधीयुक्त सांडपाणी साठल्याने काझी गल्ली, कुंभारवाडा, रोहिदास नगर, आंबेडकर नगर, व इतर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील मागील नऊ महिन्यात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सदर दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित असून कुठल्याही प्रकारची रोग प्रतिबंधक फवारणी राशीन ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये करण्यात आलेली नाही.
यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून लहान मुले डेंगू मलेरिया टायफड इतर गंभीर आजारांनी वारंवार आजारी पडत आहेत. याविषयी प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन येथे जाऊन विचारपूस केली असता आरोग्य प्रतिबंधक धूर फवारणी बाबत विचारणा केली असता, दिनांक.३/११/२०२३ रोजी लेखी स्वरूपात ग्राम विकास अधिकारी कापरे यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच आज रोजी देखील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. पत्रात असे नमूद केली आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन अंतर्गत राशीन गावामध्ये तापाचे,व डेंगू रुग्णांची वाढ होत असल्यामुळे राशीन ग्रामपंचायतने आपल्या स्तरावर धूर फवारणी करणे आवश्यक आहे. धूर फवारणी केल्यास कोणत्याही आजाराची साथ होणार नाही.
याबाबत दक्षता घ्यावी अशी लेखी पत्र ग्रामपंचायत दप्तर देण्यात आले आहे. या प्रलंबित विषयाकडे ग्राम विकास अधिकारी रोहिदास कापरे व सरपंच यांनी लक्ष घालून दुर्गंधी युक्त मैलामिश्रित सांडपाण्याचा ड्रेनेज पाईपलाईनचे पक्के काम करावे तसेच संपूर्ण गावांमध्ये रोग प्रतिबंधक धूर फवारणी करावी अशी मागणी काझी गल्लीतील आसिफ काझी, शहानवाज मुक्तार काझी, इक्बाल शेख, यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तरी सदर निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.