राशीन ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात? अंत्यविधी यात्रा प्रवास दुर्गंधी सांडपाण्यामुळे झाला खडतर.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथील सोनारवाडी रोडवरील स्मशानभूमी रस्त्यावर राशीन गावातील दुर्गंधी युक्त सांडपाणी गटार मोठ्या प्रवाहने कायमस्वरूपी वाहत असून या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मयत झालेल्या व्यक्तीची अंत्ययात्रा दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून खडतर प्रवास करीत अंत्यविधी ठिकाणी न्यावी लागते. तसेच दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे राशीन व परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असून मलेरिया टायफड, डेंगू, सर्दी खोकला असे अनेक गंभीर आजार या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना होत आहेत.
याबाबत अनेक वेळा काझी गल्ली, कुंभारवाडा, माळवाडी, रोहिदास नगर, आंबेडकर नगर या भागातील नागरिकांनी तसेच माजी सरपंच अल्लाउद्दीन काझी यांनी रोगप्रतिबंधक फवारणी बाबतअनेक वेळा निवेदनाद्वारे राशिन ग्रामपंचायतला माहिती दिली आहे .परंतु याबाबत सरपंच ,उपसरपंच, सदस्य ,ग्रामविकास अधिकारी, यांनी महत्वकांक्षी विषयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. तरी लवकरात लवकर या विषयाचे गांभीर्य ओळखून या रस्त्यावर अंडरग्राउंड सिमेंट काँक्रीट पाईप टाकून दुर्गंधी पाण्याचा प्रवाह गाव वड्यात सोडावा. जेणेकरून रस्त्यावरून दुर्गंधी पाणी साठवण होणार नाही. व अंत्ययात्रा मार्ग सुरळीत होईल. तसेच राशीन परिसरात रोग प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी यामुळे अनेक होणाऱ्या दीर्घ आजारांना आळा बसू शकेल.