राशीन येथे आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवरायांची भव्य दिव्य मिरवणूक संपन्न होणार.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त औचित्य साधत राशीन येथे आज सायंकाळी ६ .वाजता शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवरायांचा भव्य दिव्य मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे .प्रमुख आकर्षक, छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी २० फुटी मूर्ती, ओैकार ७२+ न्यू सिरीज गोल्डन लाईट शो.
राैंद़़ शंभो महिला ढोल पथक पुणे,
मर्दानी खेळ जामखेड हत्ती, घोडे, उंट,.
सैराट फेम केमचे हलगी पथक.
राशीन शहरात सर्वत्र भव्य रांगोळी. असे मुख्य आकर्षण आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक सोहळ्यात सर्व शिवभक्तांना व इतर नागरिकांना पहावयास मिळणार आहे तरी आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राशिन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.