ब्रेकिंग
दादा पाटील महाविद्यालयाच्या सोनाली मंडलिकला सुवर्णपदक

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपट्टू सोनाली मंडलिक हिने चंदीगड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.
सुवर्णकन्या सोनाली मंडलिक हिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.