pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

महसूल विभागाची डोळेझाक; चिलवडीसह तालुक्यातील बहुतांश गावाच्या हद्दीत अवैध वीटभट्ट्यांचा सुळसुळाट

Samrudhakarjat
4 6 0 0 8 6

कर्जत/ प्रतिनिधी : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चिलवडी गावच्या हद्दीत अवैध वीटभट्ट्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कोणत्याही शासकीय परवानग्या नसताना तब्बल १५ ते २० वीटभट्ट्या या परिसरात खुलेआम सुरू असून, गेल्या सहा वर्षांपासून फॉरेस्ट व गायरान क्षेत्रातील मातीची बेकायदेशीर चोरी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.असेच काही व्हिडिओ , फोटो साप्ताहिक समृध्द कर्जतच्या व्हाट्सअप ग्रुप वर आले यावर त्या भागातील पहाणी केले…

असता या प्रकरणात महसूल विभाग कर्मचारी व वन अधिकारी व वन विभाग कर्मचारी यांची भूमिका संशयास्पद असून, संबंधित यंत्रणेने जाणीवपूर्वक आर्थिक व्यवहारातून या गोष्टींकडे डोळे झाक केल्याच दिसून येत आह या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे… विशेषबाब म्हणजे काही वीटभट्टी चालक करमाळा तालुक्यातून येऊन दादागिरी करत हा व्यवसाय चालवत आहेत…

यामध्ये विलास चव्हाण, अक्षय चव्हाण, सोमनाथ चव्हाण रा. सावडी ता. करमाळा तसेच कर्जत तालुक्यातील दुरगाव व स्थानिक लोकांच्या आहेत हे प्रमुख मालक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांना आर्थिक व्यवहार करून हा अवैध व्यवसाय निर्धास्तपणे चालवला जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, पर्यावरणाचा ऱ्हास, जंगल क्षेत्राची झाडे तोडून नासधूस आणि गायरान जमिनींचे अस्तित्व धोक्यात येत आहे…

या अवैध वीटभट्ट्यांमुळे परिसरातील नागरिकांना धूर, प्रदूषण, रस्त्यांची खराब अवस्था व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

“प्रशासन कधी जागे होणार?” असा सवाल आता चिलवडी परिसरातील ग्रामस्थ विचारत असून, तात्काळ संयुक्त तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker