युवराज ढेरे यांची स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी निवड


कर्जत | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढेरे मळा येथील स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी युवराज ढेरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.
शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्कूल कमिटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि पालक-शिक्षक यांच्यातील समन्वय मजबूत करण्यासाठी युवराज ढेरे यांच्या नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

युवराज ढेरे यांच्या निवडीबद्दल शिक्षक, पालक, ग्रामस्थ, मित्रपरिवार व हितचिंतकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.



