google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करीम शेख यांची ‘राज्य कर निरीक्षक’ पदी निवड; श्री जगदंबा विद्यालयातर्फे विशेष सत्कार

Samrudhakarjat
4 9 7 0 9 3

राशीन ( प्रतिनिधी, जावेद काझी): – जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयाचा माजी विद्यार्थी करीम शेख याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत ‘राज्य कर निरीक्षक’ (State Tax Inspector) पदी झेप घेतली आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल श्री जगदंबा विद्यालयाच्या वतीने त्याचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश उढाने साहेब आणि उपमुख्याध्यापक संग्राम राक्षे साहेब यांच्या शुभहस्ते करीम शेख यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत करीम यांनी अभ्यासातील सातत्य सोडले नाही. त्यांच्या या यशामुळे श्री जगदंबा विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण राशीन परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश

या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक प्रकाश उढाने म्हणाले की, “माजी विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. योग्य ध्येय आणि कठोर मेहनत घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर पोहोचू शकतात, हे करीमने सिद्ध केले आहे.” करीमच्या या यशामुळे विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक प्राध्यापक विकी साळवे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी मयूर धनवडे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गांगर्डे सर यांनी मानले. श्री जगदंबा विद्यालय व राशीन ग्रामस्थांच्या वतीने करीम शेख यांना पुढील भावी शासकीय सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker