pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचा निमित्त शालेय विद्यार्थांना स्कूल बॅग वाटप

Samrudhakarjat
4 6 6 0 3 3

(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत शहरात शालेय बॅग वाटप समारंभ उत्साहात संपन्न झाला. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ढेरे मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

 हा कार्यक्रम बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी शारदाबाई पवार सभागृह, कर्जत येथे झाला. यावेळी आ. रोहित पवार, सुनंदाताई पवार, माजी नगराध्यक्षा उषा राऊत, सविता व्होरा, पूजा सूर्यवंशी, प्रतिभा भैलुमे, प्रीती जेवरे, राणी कानगुडे, आयेशा शेख, मनीषा शेळके, बाळासाहेब साळुंके, राम ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहर कार्याध्यक्ष भूषण ढेरे यांच्या वतीने हा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आला. आ. रोहित पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker