राशिन महावितरण चा अनागोंदी कारभार! शिवसेनेचा निवेदनद्वारे उपोषणाचा इशारा.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. राशीन येथील विद्युत वितरण कार्यालय संदर्भात ग्राहकांकडून वारंवार सतत येणारे तक्रारीचे निरसन न होत असल्यामुळे राशीन शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या जिल्हा उप प्रमुख बापूसाहेब नेटके मेजर शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर नितीन तोरडमल युवा सेना तालुका प्रमुख सोमनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार निवेवन देऊन ही न दखल घेतल्यामुळे केराची टोपली दाखल्यामुळे उपोषण करण्याचं पाऊल उचलावा लागले विद्युत कार्यालय उपोषणाची निवेदनाद्वारे मागणी केली आहे शिवसेना राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे तालुका उप प्रमुख ऋषभ परदेशी अशोक पवार राशीन जिल्हापरिषद गट प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील विद्युत वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या

वकर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभार सतत चालल्याचे निदर्शनास दिसून येत असल्यामुळे तसेच वारंवार लाईट जाणे, पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा न मिळणे, पूर्वसूचना न देता लाईट बंद करणे, विज उपकेंद्रात अडचणीच्या काळात फोन केला असता उडवावीचे उत्तरे दिली जातात, फोन न उचलणे नवीन वीज कनेक्शन जोडणी साठी ग्राहकांना विनाकारण हेलपाटे मारण्यास भाग पाडणे, वाढीव वीज शुल्क आकारणे, चुकीचे विले काढणे, रेडींग न घेता अंदाजे बिले काढणे, अंदाजे वाढीव वीज दर आकारणे, विद्युत ग्राहकांवर बेकायदेशीरपणे चुकीची कारवाई करणे, तसेच विद्युत वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे व नागरिकांच्या समस्येबाबत निवेदन दिल्यास सामान्य नागरिकांमध्ये चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवतात, वीज ग्राहकांच्या अनेक समस्या बाबत वेळोवेळी मागणी करून देखील अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई होत नाही .

महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वारे साहेब यांनी देखील या समस्ये कडे कानाडोळा न करता गांभीर्यपूर्वक लक्ष घालून राशिन महावितरण चे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लक्ष केंद्रित करावे भर दिवाळीच्या पाडव्या दिवशी संध्याकाळी देखील विजेचा लपंडाव राशीन मध्ये सुरूच होता . या सर्व वारंवार येणाऱ्या समस्येला कंटाळून महावितरणला घाम फोडण्यासाठी, झोपी गेलेल्या महावितरण जाग आणण्यासाठी शिवसेना व वीज ग्राहकांच्या वतीने दिनांक २७.१०.२०२५. रोजी राशीन येथील विद्युत वितरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे .याची सर्वस्वी जबाबदारी शाखा अधिकारी शाखा अधिकारी कळंबे साहेब यांची असेल. याबाबतचे निवेदन महावितरण वरिष्ठ कार्यालयास देण्यात आले आहे.



