राशीन मध्ये दिवसाढवळ्या धाडसी चोरी; पोलिसात गुन्हा दाखल.

राशिन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन भिगवन रस्त्यावर पाण्याच्या टाकी समोर आढाव कॉलनीमध्ये शनिवार दिनांक १७/२/२०२४ . रोजी भर दिवसा दुपारी ३ च्या सुमारास शफिक पिंजारी व सासू नुरजहा पिंजारी यांच्या बंद असलेल्या घराचा सेफ्टी दरवाजा तोडून अज्ञात चोट्याने दीड लाखाची रोकड व दोन जोड पैंजण चोरून धूम ठोकली आहे. याप्रकरणी राशीन पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बाबत सविस्तर माहिती अशी आहे की,
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास राशिन भिगवन रस्त्यावर पाण्याच्या टाकी समोर आढाव कॉलनी परिसरातील शफिक पिंजारी व नूर जहाँ पिंजारी यांच्या बंगल्याचा सेफ्टी दरवाजा चोरट्याने लोखंडी कटावणीने तोडून कपाटात ठेवलेली दीड लाख रुपयाची रोकड रक्कम व दोन जोड चांदीचे पैंजण चोरून नेले. पिंजारी यांनी बांगड्याच्या व्यवसायासाठी व मेहुणींच्या लग्नासाठी ही रोकड घरात आणून ठेवली होती. चोर चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसला असल्याची चाहूल शेजाऱ्यांना लागताच आसपासच्या शेजाऱ्यांनी पिंजारी यांच्या बंगल्याकडे धाव घेत दरवाजासमोर जाऊन उभा राहिले असता. चोरट्याने बंगल्याच्या स्लॅबवरून उडी टाकून चोराने पळ काढला. परंतु चोराला बंगल्या शेजारी लावलेली दुचाकी होंडा गाडी येथील जमलेल्या आसपासच्या शेजाऱ्यांमुळे नेहता आली नाही. परंतु ही दुचाकी चोराची आहे की अन्य कोणाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ह्या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांनी तात्काळ लगेच पथक आणून पाहणी केली असून पुढील तपास चालू केला आहे.
राशीन परिसरात मागील आठवड्यापासून चोरी सत्र जोमाने सुरू असून जगदंबा हाऊसिंग सोसायटीमध्ये एकाच रात्रीत आसवानी, एकाड, अन्य एक अशा तीन घरफोड्या झाल्या असून मुद्देमाल देखील चोरी गेला आहे परंतु या संदर्भात अध्याप काही सुगावा लागलेला नाही. तरी पोलीस प्रशासनाने अवैद्य धंद्याच्या वसुलीकडे लक्ष न देता वारंवार होणाऱ्या चोऱ्यांवर लक्ष केंद्रित करून रात्रीचे पेट्रोलियम करणे अत्यंत गरजेचे आहे.