आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीने बारडगाव स्मशानभूमी प्रश्न मार्गी भास्कर भैलुमे यांच्या पाठ पुरवठयाला यश.

कर्जत (प्रतिनिधी) :- मौजे बारडगाव सुद्रिक येथील ग्रामपंचायत हद्दी मधील सि.स.न. 174 मध्ये हरिजन स्मशानभूमी या नावे श्रेञ 1101.4 चौ.मी गट नंबर 1/2 मध्ये 0.01 आर व सर्वे 2/2 मध्ये 0.02 आर असे श्रेत्र हरिजन स्मशानभूमी साठी आहे व गट नंबर 7 व सर्वे नंबर 1 मधील दलित स्मशानभूमी तील केले अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी दिनांक 1/7 /2024 रोजी तहसिल कार्यालया समोर सकाळी 11 वाजल्या पासून अमरण उपोषण करण्यात आले होते तेव्हा आपल्या मार्फत आंदोलन स्थगित करण्यासाठी एका महिन्यात तेथील अतिक्रमण काढून दलित स्मशान भूमी तेथील दलित समाजाच्या ताब्यात देण्यात येईल असे लेखी पत्र दिले होता पन आज तागायत कोणतीच कार्यवाही अतिक्रमण काढण्याबाबत करण्यात आली नाही याच्या निषेधार्थ मौजे बारडगाव सुद्रिक येथील सर्व दलित समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक 17/9/ 2024 रोजी सकाळी 11 वाजल्या पासुन आपल्या कार्यालयात बेमुदत अमरण उपोषण करत आहोत जो पर्यत अतिक्रमण निघत नाही तो पर्यत हे आंदोलन चालु राहील असे सर्व भीम सैनिक यांनी आव्हान दिले होते.
आमदार रोहित पवार, पाणी पुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, नगरसेवक भास्कर भैलुमे,नगरसेवक रज्जाक झारेकरी नानासाहेब साबळे, अमोल साबळे, मुकेश गायकवाड, अँड दत्तात्रय चव्हाण, महादेव साबळे, ज्ञानदेव साबळे, सुरेश गायकवाड, मुकेश गायकवाड, अमोल साबळे, गणेश सुद्रीक, विलास ठोकळे, आदी उपोषण कर्ते उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांनी उपोषणाला भेट दिली व उपोषणकर्त्यांची मध्यस्ती राहून गट विकास अधिकारी यांनी लेखी पत्र व तोंडी आश्वासन सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी दिल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.
आमदार रोहित पवार यांनी उपोषणकर्त्यांला पाणी देऊन उपोषण सोडले