दादा पाटील महाविद्यालयात हार्ट फुलनेस मेडिटेशन कार्यशाळेचे आयोजन.

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे हार्ट फुलनेस मेडिटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. ऋषिकेश उदमले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ऋषिकेश उदमले यांनी सांगितले की, कोणताही विषय ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्यांची मनाची स्थिरता अत्यंत आवश्यक असते. मन स्थिर ठेवण्यासाठी मेडिटेशनची आवश्यकता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील शिक्षणाची राजधानी म्हणून दादा पाटील महाविद्यालयाची ओळख आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, ध्यान-धारणा व शारीरिक क्षमता या अभ्यासासाठी पूरक गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांनी मानसिक व शारीरिक तंदुरुस्त असणे अत्यंत गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. जयदीप खेतमाळीस यांनी केले. तर आभार प्रा. प्रविण घालमे यानी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.