कर्जत पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा.

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत पोलीस स्टेशन मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षीप्रमाणे रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले.
समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम पोलिस विभागातील प्रत्येक जन करती
असतो नवी सर्व हक्क सर्व नेहमीच कर्तव्य बजावत असताना त्यांना कुठलाही सण उत्सव आपल्या कुटुंबासमवेत साजरा करायला मिळत नाही. आपल्या ड्युटीसाठी सदैव तत्पर असलेल्या या पोलिस बांधवांप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्याच्या भावनेतून गेल्या तीन वर्षांपासून कर्जतमधील नक्षत्र सखी मंच आणि माझी वसुंधरा ग्रुप च्या महिला हा उपक्रम राबवत आहेत. असे स्वाती पाटील यांनी सांगितले.
यावेळी सर्व महिलांनी पोलीस बांधवांचे औक्षण करून राख्या बांधल्या. त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस स्टेशनमध्ये साजऱ्या झालेल्या या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाने सर्व पोलीस भारावून गेले.
यावेळी पोलीस अधिकारी श्री. अरुण पाटील तसेच सर्व पोलीस उपस्थित होते. स्वाती पाटील, मनिषा सोनमाळी, शबनम मुंढे, माधुरी कल्याणकर, वैशाली टकले, अश्विनी घेरडे, पुष्पा शिंदे, शिल्पा माळवे, जयश्री वाघमारे, सविता राजापूर, वैशाली अनारसे आदी महिला भगिनी या वेळी उपस्थित होत्या.