रमाईनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे बाबत राशीन ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी.

राशीन( प्रतिनिधी) जावेदकाझी. :- राशीन येथील वार्ड क्रमांक १ मध्ये जगदंबा देवीच्या मंदिरालगत असलेले रमाई नगर येथे रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्यास मंजुरी मिळाली असून काही दिवसात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम देखील सुरू होणारा असून मात्र त्या ठिकाणी रस्त्यावर काही रहिवासी नागरिकांनी अतिक्रमण केलेले असून हे अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ नये. रस्त्यावरील झालेल्या अतिक्रमणाबाबत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी समक्ष येऊन शहानिशा करून रस्त्यावर झालेले अतिक्रम काढण्यास संबंधित रहिवाशांना ग्रामपंचायत मार्फत समस देऊन झालेली अतिक्रमण काढूनच रस्ता तयार करावा. आढाव यांच्या घरापासून ते काळुबाई मंदिरापर्यंत ब्लॉक बसवण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे रमाई नगर येथील रहिवाशी विकी कांबळे, ईश्वर माने, गजानन माकुडे, ओंकार माने ,दादा माने, दीपक माने, विशाल माने, पाेपट जाधव , रामकुमार चलरेजा, सुनील अडसूळ, अर्जुन गायकवाड यांनी राशीन ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन . राशीन चे सरपंच नीलम साळवे यांचे पती युवा नेतृत्व भीमराव साळवे, यांंना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे . यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.