पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई.

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांनी कर्जत पोस्ट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार कुळधरण गावातील हॉटेल ऋषिकेश, हॉटेल सागर, येथे देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने उपाधीक्षक अरुण पाटील यांनी स्टाफ सह सदर ठिकाणी छापा टाकून हॉटेल सागर मध्ये काउंटरच्या आडोशाला देशी विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेल सागर वर कारवाई करत असताना हॉटेल ऋषिकेशच्या चालकाने हॉटेलचे शटर बंद करून पळ काढला परंतु या हॉटेलमध्ये पंच यांच्या समक्ष छापा टाकून हॉटेलमध्ये असलेल्या बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
तसेच हॉटेल ऋषिकेश वर कारवाई करत असताना खंडोबाचा माळ कुळधरण येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी दारु तयार करण्याच्या कच्च्या रसायनाचे त्याच जागी नाश करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे पोलीस कॉन्स्टेबल कोल्हे कोहक ढवळे वारे बर्डे महिला पोलीस व्यवहारे यांनी केली आहे.