हरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील भीमसैनिकांच्या वतीने जाहीर निषेध.

कर्जत (प्रतिनिधी): – अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथील दलित समाजातील तरुणांना कबूतरे व शेळी चोरण्याचा संशयावरून जातीयवादी गाव गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्या प्रकरणी कर्जत तालुक्यातील समस्त भिम सैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करून कर्जत येथील पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हरेगाव येथील जातीयवादी गाव गुंड नाना गलांडे, मनोज बोडके, दिपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजु बोरने यांनी दलित समाजातील तरुणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेचा कर्जत तालुक्यातील भिम सैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. अश्या गुंड प्रवृत्तीच्या गावगुंड यांचा त्वरित बंदोबस्त करावा व त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पुरोगामी म्हटल्या जाणार्या महाराष्ट्र राज्यात अश्या प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने आंबेडकर समाजातील घटकात प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करून मागण्याचे निवेदन देण्यात आले.
योग्य तो कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे. महत्त्वाच्या आरोपीला अटक केलेले आहे. यातील बाकीचे आरोपी फरार आहेत. सध्या महाराष्ट्रभर दलित अत्याचाराच्या वयाच घटना घडत असताना प्रशासनमात्र सदर घटनांकडे डोळे झाक करीत आहे. तसेच सदर घटनांमुळे दलित समाजामध्ये तीव्र वातावरण तयार झाले आहे. याचा उद्रेक आंबेडकरी चळवळीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वेळीच सदर आरोपींवरती योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. सदर निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहे .
१) मौजे -हरेगांव, ता. श्रीरामपुर येथील घटनेमधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
२) सदर घटनेच्यावेळी महीलांना देखील धक्काबुक्की केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
३) सदर घटनेतील पिडीत कुटुंबांना व पिडीत मुलांना पोलीस संरक्षण मिळावे.
४) सदर घटनेतील पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करणेबाबत योग्य ती कारवाई करावी.
५) सदर घटनेतील आरोपीवरती बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सदर आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात यावी.
६) सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा तसेच सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी.
(७) सदर घटनेतील पिडीत कुटुंबांना समाजकल्याण विभागामार्फत अर्थिक सहाय्य करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी.
वरील मागण्यांची आपण दखल घेवुन संबंधीत पिडीत कुटुंबांना योग्य तो न्याय देण्यात यावा. अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रभर सदर घटनेची दखल घेवुन समस्त भिमसैनिक तिव्र आंदोलन करण्याचा इशार या निवेदना द्वारे देण्यात आला यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमे, अँड दत्ता चव्हाण ,संतोष आखाडे, विजय साळवे ,अजय भैलुमे, नंदकिशोर गाडे ,आप्पा सरोदे, अनिल समुद्र, सद्दाम कुरेशी, किरण भैलुमे, किशोर कांबळे, करण ओव्हळ ,प्रा. अमोल क्षीरसागर, सुरज कदम, सुमित भैलुमे, प्रकाश कांबळे, इम्रान कुरेशी, डोळारे सी एम आदि भिम सैनिक उपस्थित होते