अॅड. तुषार झेंडे यांची सलग तिसऱ्यांदा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्यपदी निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- येथील अॅड. तुषार झेंडे यांची सलग तिसऱ्यांदा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्यपदी निवड झाली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी झेंडे यांच्या निवडीचे आदेश दिले आहेत. अॅड झेंडे गेल्या २० वर्षापासून करीत असलेल्या ग्राहक प्रबोधन मार्गदर्शन आणि सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हा आयोग न्यायाधीश यांच्या समितीने तीन वर्षांसाठी निवड केली आहे. निवडीनंतर अॅड. झेंडे म्हणाले की, ग्राहक कायद्यातील त्रुटी केंद्र सरकारने दुर केल्या आहेत. आता काही तक्रारी असल्यास ग्राहक घरी बसुन जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार करु शकतो. त्याची दखल घेतली जाते.
ग्राहकांनी या कायद्याचा फायदा घ्यावा.ग राहक हित, ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी कटीबध्द असल्याचे अॅड. झेंडे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, परीषदेच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण शासन स्तरावर राज्यात शासकीय कर्मचार्यांच्या जेवणाची वेळ निश्चित करण्यासाठी झेंडे यांचा पुढाकार महत्वाचा ठरला. याबाबत त्यांनी शासनाकडे मागणी केल्यानंतर शासनाने परीपत्रक काढत शासकीय कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ निश्चित केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना दुपारी ताटकळत न थांबता शासकीय कामे वेळेत मार्गी लागण्यास मदत झाली