महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय 59 वे आधिवेशन वर्ध्यात आयोजित

कर्जत: महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 15 व 16 मार्च 2025 रोजी वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील ग्रंथालयीन कर्मचारी, ग्रंथालय पदाधिकारी, साहित्यिक आणि वाचनप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाचे ज्येष्ठ संचालक पनाजी कदम यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५९ वे वार्षिक अधिवेशन सत्यनारायण बजाज जिल्हा वाचनालय, वर्धा येथे होणार आहे. वर्धा हे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन खा. अमर काळे यांच्या हस्ते होणार असून, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोठेवार यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न होईल. तसेच राज्य ग्रंथालय संचालक आणि अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ही राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांची शिखर संस्था आहे. त्यामुळे या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाचे संस्थापक सचिव सदाशिव शेळके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे, कार्याध्यक्ष ॲड. आजिनाथ जायभाय, संचालक सुखदेव मोहिते, नामदेव गरड, विष्णुपंत पवार, भाऊसाहेब गवळी, संभाजी पवार, शशिकांत झंझाड, अमोल इथापे, प्रा. बाळासाहेब शेलार, पी. डी. आहेरे पाटील, नवनाथ मस्के, दीपक आगळे, राजेंद्र तरटे, विकास बांगर, ज्ञानदेव अनारसे, गायकर सर, राज्य ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपान पवार, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील आणि राम मेखले यांनी केले आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रदीप कुमार बजाज असतील.