ब्रेकिंग
राशीन येथील बंद पडलेला विद्युत प्रवाह विद्युत कर्मचाऱ्यांनी भर पावसात काम करीत पूर्ववत सुरळीत केला.

Samrudhakarjat
4
0
1
4
1
5
राशीन( प्रतिनिधी):- जावेद काझी.राशीन परिसरातील आज मंगळ बाजार दिवशी भर दुपारी विद्युत प्रवाह वाऱ्याच्या व पावसाच्या जोरदार प्रवहाने खंडित झाल्यामुळे संपूर्ण राशीन शहराची लाईट गेली असता विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ भर पावसामध्ये दोन तास विद्युत खांबावर चडून मेहनत करीत विद्युत रोहित्रचा झालेला बिघाड तात्काळ दुरुस्त करून विद्युत प्रवाह यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे वायरमन साळवे, पटले, जाधव, कदम व इतर कर्मचाऱ्यांनी भर पावसात काम करून राशीन व परिसरातील विद्युत प्रवाह सुरळीत केला मात्र मदिना मकतब काझी नगर परीटवाडी परिसरातील विद्युत प्रवाह काही तांत्रिक बिघाडामुळे व अडचणीमुळे आज पूर्ववत होऊ शकला नाही तो उद्या पुरवत होईल अशी माहिती वायरमन साळवे यांनी यावेळी दिली.