google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

प्राचार्य राजेंद्र नष्टे पुणे जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित; राशीन परिसरात आनंदाचे वातावरण

Samrudhakarjat
4 9 8 4 2 3

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी.

ज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राशीन येथील प्राचार्य राजेंद्र नष्टे यांना पुणे जिल्ह्यात नुकतेच तीन वेगवेगळ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या यशामुळे राशीनसह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्राचार्य नष्टे यांना मिळालेले तीन पुरस्कार खालीलप्रमाणे:

आदर्श प्राचार्य पुरस्कार: धोंडू मामा मेडिकल कॉलेज, पुणे येथील सेमिनार हॉलमध्ये भारत सरकारचे कल्याण विभाग डेप्युटी डायरेक्टर यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते ‘ज्ञानदायिनी शिक्षण संस्था’तर्फे प्रदान…

महाराष्ट्र भूषण आदर्श प्राचार्य पुरस्कार: पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन’तर्फे प्रदान.

संत ज्ञानेश्वर माऊली आदर्श प्राचार्य पुरस्कार: आळंदी येथील भव्य सोहळ्यात प्रसिद्ध सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान.

प्राचार्य राजेंद्र नष्टे यांचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून समाजासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. एकाच वेळी तीन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल राशीन येथील ज्येष्ठ नागरिक कदिर शेठ कर्जतकर, शहाणे गुरुजी, शरदचंद्र शेटे सर, ससाने गुरुजी, देविदास सोनवणे, देविदास साळवे, भा. को. साळवे गुरुजी आणि घोडके गुरुजी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker