google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

मातंग एकता आंदोलनाच्या अहिल्यानगर युवक जिल्हाध्यक्षपदी विजय शिंदे यांची निवड

Samrudhakarjat
5 1 6 0 3 8

(कर्जत प्रतिनिधी) :- मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा. श्री. रमेशदादा बागवे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन मा. विजय शिंदे यांची मातंग एकता आंदोलनाच्या अहिल्यानगर जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शिंदे यांच्या निवडीमुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्यातील संघटनेच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फोन करुन अभिनंदन केले आहे. ही निवड माझ्यासाठी केवळ नियुक्ती नसून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची मोठी जबाबदारी आणि प्रेरणा आहे, अशी भावना विजय शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाशजी बागवे, राज्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी काळोखे, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब लोंढे पत्रकार दत्ता उकिरडे यशवंत गायकवाड भाऊसाहेब यादव जगताप भाऊसाहेब कुंडलिक जगताप मेघराज जगताप संजय जगताप अशोकराव सकट दिनेश भिसे कल्याण जगधने प्रभाकर पवार विजय शिंदे गणेश शिंदे पपु जगताप राघु जगधने रवि लोंढे विनोद लोंढे ,नाना शिंदे श्रीराम जगताप संदीप पवार सचिन पवार आकाश पवार आनंद उकिरडे संतोष ढावरे दादा लोंढे तसेच राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, राज्यातील जिल्हा अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“समाजातील युवकांना एकत्रित करून, त्यांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि संविधानिक मार्गाने कार्य करण्याचा माझा संकल्प आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर ही जबाबदारी निश्चितच समर्थपणे पार पाडेन. आपला विश्वास हीच माझी ताकद आहे.” असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी केले.

त्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker