google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

झोपडीतील मुलाची कृषीशास्त्रज्ञ म्हणून भरारी; आता ‘प्रधान वैज्ञानिक’ पदावर झेप

बेलवंडीच्या मातीतून देशातील प्रतिष्ठित कृषी संशोधन संस्थांपर्यंत डॉ. अंकुश कांबळे यांचा प्रेरणादायी प्रवास

Samrudhakarjat
5 1 6 0 3 6

कर्जत : कर्जत तालुक्यातील बेलवंडी या छोट्याशा गावातील अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत झोपडीत जन्मलेल्या डॉ. अंकुश लाला कांबळे यांनी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे नवे शिखर गाठले आहे. २०१० मध्ये कृषीशास्त्रज्ञ म्हणून झालेल्या निवडीपासून सुरू झालेली त्यांची यशस्वी वाटचाल आता भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वैज्ञानिक संवर्गातील ‘प्रधान वैज्ञानिक’ (Principal Scientist) या महत्त्वपूर्ण पदापर्यंत पोहोचली आहे.

अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ. कांबळे यांनी देशातील अग्रगण्य कृषी संशोधन संस्था भारतीय कृषी अनुसंधान संस्थान (IARI), नवी दिल्ली येथून कृषी अर्थशास्त्र विषयात एम.एस्सी. (कृषी) तसेच पीएच.डी. पदवी संपादन केली. पीएच.डी.चे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी कृषी वैज्ञानिक निवड मंडळाच्या (ASRB) तीन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेत यश मिळवत कृषीशास्त्रज्ञ म्हणून निवड मिळवली.

निवडीनंतर हैदराबादसह विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती ICAR-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थान, बारामती येथे झाली. त्यानंतर ICAR-IISS, भोपाळ आणि ICAR-ATARI, पुणे येथे विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. सध्या ते ICAR-केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थान (ICAR-CIFE), मुंबई येथे कार्यरत आहेत.

गेल्या सुमारे १५ वर्षांच्या सेवाकाळात डॉ. कांबळे यांनी चार वेळा पदोन्नती मिळवत आपल्या कार्यक्षमतेची आणि संशोधनातील योगदानाची सातत्याने छाप पाडली. आता वैज्ञानिक संवर्गातील सर्वोच्च श्रेणीतील ‘प्रधान वैज्ञानिक’ पदावर त्यांची पदोन्नती झाली आहे. एका छोट्याशा गावातील झोपडीतून सुरू झालेला हा प्रवास देशातील प्रतिष्ठित संशोधन संस्थेतील जबाबदारीच्या पदापर्यंत पोहोचला आहे.

संशोधनासोबत शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष काम

डॉ. कांबळे यांनी आपल्या कारकिर्दीत विविध विषयांवर मोठ्या प्रमाणात संशोधन निबंध, पुस्तके, तांत्रिक व विस्तार पुस्तिका, प्रशिक्षण मार्गदर्शिका, पुस्तकांतील प्रकरणे तसेच तांत्रिक आणि लोकप्रिय लेख प्रकाशित केले आहेत. संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी आणि ग्रामीण समाजाला मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

गरिब शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉ. कांबळे यांना शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांविषयी विशेष आस्था आहे. विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे.

सध्या मुंबई येथील ICAR-केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थानात कार्यरत असताना ते प्लास्टिक अस्तरीकरण असलेल्या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन या विषयावर संशोधन व विस्तारकार्य करीत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेततळ्यांचा मत्स्यपालनासाठी प्रभावी वापर, उत्पादनवाढ आणि उत्पन्नवाढ यासंदर्भात त्यांचे काम सुरू आहे.

बेलवंडीच्या झोपडीपासून ‘प्रधान वैज्ञानिक’ पदापर्यंत…

२०१० मध्ये ‘झोपडीतील मुलाची कृषीशास्त्रज्ञ म्हणून भरारी’ अशी दखल घेतलेल्या डॉ. अंकुश लाला कांबळे यांच्या यशस्वी वाटचालीने आता ‘प्रधान वैज्ञानिक’ पदापर्यंत मजल मारली आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याचा प्रेरणादायी आदर्श त्यांच्या प्रवासातून समोर आला आहे.

कर्जत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या भूमिपुत्र डॉ. अंकुश लाला कांबळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

त्यावेळी अभिनंदनात पनाजी कदम, प्रमोद भैलूमे, जालिंदर सोनवणे, दीपक समुद्र, विक्रम कांबळे , घोडेराव साहेब, साधू सरोदे साहेब,दिपक शिंदे, अरूण शेलार, बेस्ट फ्रेंड ग्रुप सर्कल , सह कर्जत तालुक्यातील मान्यवरांकडून डॉ• कांबळे सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker