google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

“चोरी पकडल्यानंतर प्रामाणिकपणाचा आव!”; राम शिंदेंच्या जिल्हा बँक माघारीवर रोहित पवारांचा घणाघात

Samrudhakarjat
5 1 3 2 7 3

कर्जत (प्रतिनिधी) :- राज्यात सध्या विधानपरिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी शेतकरी हित आणि कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी माघार घेत असल्याचं म्हटलं. मात्र, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निर्णयातून माघार घेण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करुन राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आधी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा गाजावाजा करुन अर्ज भरला, पण त्यांना तीन अपत्ये असल्याची बाब आम्ही समोर आणताच त्यांना अचानक पदाची अप्रतिष्ठा होऊ नये असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी माघार घेतली. आधीच नियमांचा आदर केला असता तर आज अर्ज माघारी घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नसती आणि संविधानिक पदाचीही अप्रतिष्ठा झाली नसती. आता चोरी पकडली गेल्यानंतर प्रामाणिकपणाचा आव आणण्याचा हा प्रकार आहे.. दुसरं काय…!, असं रोहित पवार म्हणाले.

राम शिंदे माघार घेताना काय म्हणाले?

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राम शिंदे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

व्यक्तिगत महत्त्वकांक्षांपेक्षा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं राम शिंदे यांनी जाहीर केलं आहे. बँकेच्या निवडणुकीतून माघार घेत असलो तरी कुठल्याही राजकीय दबावातून हा निर्णय घेतलेला नसून आपल्या विवेक बुद्धीने घेतलेला निर्णय आहे, असं राम शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान, रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर 1 ऑक्टोबरला देखील टीका केली होती. तीन अपत्ये असूनही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker