google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत मध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; शिक्षक दाम्पत्य शाळेत अन् चोरट्यांचा सोन्यावर डल्ला!

८ ते ९ तोळे सोने, पाच हजारांची रोकड लंपास; कर्जत पोलिसांकडून तपास सुरू

Samrudhakarjat
5 1 3 7 5 8

कर्जत : कर्जत शहरातील समर्थ नगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शिक्षक दाम्पत्य शाळेत गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून अंदाजे ८ ते ९ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.

समर्थ नगर येथील अनिल सुभाष खंडागळे यांच्या घरात ही चोरी झाली. अनिल खंडागळे आणि त्यांची पत्नी दोघेही शिक्षक असून, नेहमीप्रमाणे ते शाळेत गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

शाळेतून घरी परतल्यानंतर खंडागळे यांना घराचे दार उघडे असल्याचे दिसले. घराजवळ जाऊन पाहणी केली असता दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले.

प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, चोरीचा नेमका प्रकार आणि चोरट्यांची संख्या याबाबत पोलिस तपासानंतरच अधिक स्पष्टता होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

दिवसा, तेही रहिवासी घरात नसल्याची संधी साधून झालेल्या या घरफोडीमुळे समर्थ नगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्याचे आव्हान कर्जत पोलिसां समोर आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker