google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

आदिवासी पारधी समाजाच्या मागण्यांबाबत तहसीलदारांचे लेखी आश्वासन; कर्जत येथील बेमुदत धरणे आंदोलन स्थगित

Samrudhakarjat
5 1 2 9 7 1

कर्जत (प्रतिनिधी) :  – आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना घराखालची जागा मालकी हक्काने मिळावी आणि उदरनिर्वाहासाठी शेतजमीन उपलब्ध व्हावी, यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर पुकारण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) सकाळी १०:०० वाजता संविधानाच्या प्रास्ताविकेस पुष्प अर्पण करून व प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. हे आंदोलन ‘संपूर्ण आदिवासी पारधी विकास कृती समिती’ व ‘भटके विमुक्त संयोजन समिती महाराष्ट्र राज्य’ तसेच ॲड. अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

महत्त्वाच्या मागण्या व प्रशासनाचा निर्णय:

पारधी समाजासाठी ग्रामपंचायत ठराव घेणे, वन हक्क समिती स्थापन करणे आणि यासाठी तातडीने ग्रामसभा आयोजित करणे, यासह वन हक्क दावे दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशा मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या होत्या. सदर दाव्यांची अंतिम मुदत १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत होती. मात्र, हे दावे यापुढेही स्वीकारणे चालूच राहील, असे स्पष्टीकरण तहसीलदार यांनी दिले.

तसेच, आदिवासी पारधी समाजातील नागरिकांच्या घरांची जागा त्यांच्या मालकी हक्काने नावावर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. राखीव वने, महाराष्ट्र शासन व फॉरेस्ट जमिनींपैकी ज्या शासकीय जमिनी रिक्त झाल्या आहेत, त्यातून भूमीहीन आदिवासी पारधी बांधवांना उदरनिर्वाहासाठी जमिनी देण्याबाबत मालकी हक्क समितीच्या वतीने निर्णय घेतला जाईल. नियमानुसार वन हक्क पट्टे तयार करून त्याचा सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, असे लेखी पत्र तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती व पाठिंबा:

यावेळी निवेदन देण्यासाठी तुकाराम पवार, डिसेना पवार, रंगीशा काळे, कायदेशीर पवार, शितल पवार, काजोरी पवार, ईश्वर काळे, शक्तिमान काळे, सर्वेनात काळे, सत्यवान काळे, दहिसर भोसले, आसराबाई काळे, दिनेश काळे, जिंदेभान काळे, अश्विनी भोसले, चंपा पवार, रवींद्र काळे, त्रिषाली काळे व सुरज भोसले यांच्यासह आदिवासी पारधी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनाला चांगदेव आप्पा सरोदे, सोमनाथ भैलुमे, पोपट शेटे, भाऊसाहेब जावळे, वस्ताद संतोष आखाडे, पैलवान विजय साळवे आणि पप्पू चव्हाण आदींनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुकाराम पवार, डिसेना पवार, रंगीशा काळे व इतर कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker