google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

मयूर दिलीप काळदाते यांच्या कर्तृत्वाला ‘Award of Excellence 2026’ ने सन्मान

जपान अभ्यास दौऱ्यानंतर सलग दुसरा सन्मान; कर्जत-जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Samrudhakarjat
5 1 2 5 3 2

कर्जत : कर्तृत्व, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर चिंचोली काळदाते (ता. कर्जत) येथील मयूर दिलीप काळदाते यांनी आपल्या यशाची आणखी एक मानाची पायरी गाठली आहे. Hospital Equipment आणि Industrial Machinery Finance क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना ‘Award of Excellence 2026’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जगप्रसिद्ध उद्योगपती आदर पुनावाला यांच्या पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड यांच्या वतीने मयूर काळदाते यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, मागील महिन्यातील जपान अभ्यास दौऱ्यानंतर मिळालेला हा सलग दुसरा मानाचा सन्मान असल्याने त्यांच्या यशाची विशेष चर्चा होत आहे.

मयूर काळदाते यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत गुणवत्ता आणि कार्यक्षमतेचा ठसा उमटविला. त्यातूनच त्यांच्या कामाची दखल घेत हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय पातळीवरील कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणाऱ्या मयूर दिलीप काळदाते यांच्या यशाकडे परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी वाटचाल म्हणून पाहिले जात आहे.

जामखेड नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष श्री. पोपट नाना राळेभात यांचे ते जावई आहेत. मात्र, कौटुंबिक पार्श्वभूमीपेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी मिळविलेला हा सन्मान विशेष उल्लेखनीय मानला जात आहे.

मयूर दिलीप काळदाते यांच्या या यशामुळे चिंचोली काळदाते गावासह कर्जत तालुका आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काळदाते कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच कर्जत-जामखेड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker