google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

रोजगार मेळाव्यातून ५५२ युवकांना नोकरीची संधी

आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे आयोजन; ३१ कंपन्यांचा सहभाग, १,८२० युवक-युवतींची उपस्थिती

Samrudhakarjat
5 1 1 7 6 3

कर्जत ता. ४ : ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून ५५२ युवक-युवतींची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना या मेळाव्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली असून, निवड झालेल्या युवक-युवतींना नियुक्तीपत्रेही देण्यात आली.

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात झालेल्या या रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३१ नामांकित कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होत विविध शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तब्बल १ हजार ८२० युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला. त्यातून ५५२ जणांची निवड करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचा उत्तर विभाग, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर सध्या रोजगार आणि आर्थिक स्थैर्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवरच विविध कंपन्यांशी थेट संपर्क साधून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनीही युवकांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून आपल्या करिअरला दिशा देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या परिसरातच संधी मिळावी, तसेच त्यांच्या शिक्षण व कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नोकरीची संधी मिळालेल्या ५५२ युवक-युवतींसाठी हा मेळावा रोजगाराबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरला. यावेळी प्राचार्य संजय नगरकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रघुआबा काळदत्ते, समन्वयक राम सातपुते, मोहन गोडसे, महादेव मोरे, प्रा. विशाल म्हेत्रे, पोपट खोसे, बाळासाहेब सपकाळ, अजित भोसले, स्वप्नील तनपुरे,अमर रूपनर, श्रीमंत शेळके, दत्ताभाऊ पोते, राहुल नवले, प्रतीक ढेरे, तानाजी पिसे, गणेश सुद्रिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker