जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत हशू आडवाणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; चार मल्लांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी) :
समाज विकास संस्था संचलित येथील हशू आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील चार मल्लांनी आपापल्या वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या व तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवला.
स्पर्धेत विविध वयोगटांत यश मिळवलेले विजेते मल्ल खालीलप्रमाणे आहेत:
हर्षद रामदास काळे – १७ वर्षे वयोगट (११० किलो) : प्रथम क्रमांक

संग्रामराजे सुरेश मोढळे – १९ वर्षे वयोगट (८६ किलो) : प्रथम क्रमांक
ऋतुराज शरद जानभरे – १९ वर्षे वयोगट (७० किलो) : प्रथम क्रमांक
राम ज्ञानदेव मोहिते – १९ वर्षे वयोगट (९२ किलो) : प्रथम क्रमांक
या चारही विजयी मल्लांची आता आगामी विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यालयाच्या वतीने सर्व विजेत्या खेळाडूंचा यथोचित गौरव करण्यात आला असून त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेचे अध्यक्ष अल्लाउद्दीन एस. काझी, प्राचार्य राजेंद्र नष्टे, ज्युनिअर विभाग प्रमुख विठ्ठल काळे तसेच क्रीडा शिक्षक आजिनाथ शिंदे, संकेत आजबे व विकास देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशामुळे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या मल्लांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




