google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सवा दरम्यान डी.जे. वाजवण्यास व भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीस बंदी.

Samrudhakarjat
5 1 1 5 1 2

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी.

श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सवा दरम्यान दि.१०/१०/२०२६ ते२५/१०/२०२६. या कालावधीत राशीन शहरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. या कालावधीत ज्योत मिरवणूक, बैलपोळा मिरवणूक इतर कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीमध्ये डीजे वाजवण्यास ग्रामपंचायतने बंदी घातली आहे. तरी संबंधित मंडळे, आयोजक, नागरिक व डीजे चालक यांनी सदर सूचनेची नोंद घेऊन बंदीचे पालन करावे अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तसेच जगदंबा देवी नवरात्र उत्सवा दरम्यान सदर कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनाकरिता येत असतात त्यांची दर्शन बारी तसेच रस्त्याने मंदिरापर्यंत जाण्या येण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेने असलेले विक्रेते यांनी रस्त्यावर रहिदारीस अडथळा निर्माण होईल असे शेड, टपरी, बाकडे, टेबल, दुकानाच्या नावाचा बोर्ड किंवा इतर विक्रीच्या वस्तू रस्त्यावर मांडले जातात. त्यामुळे भाविकांना रहदारीस अडथळा निर्माण होतो. म्हणून उत्सव कालावधीत खालील प्रमाणे दक्षता घेण्यात यावी.

१) दुकानापुढे अतिक्रमण केलेले शेड दिनांक.७/१०/२०२६. पूर्वी काढून घेण्यात यावे. 

२) यात्रेदरम्या अडथळा निर्माण होईल असे शेड, बाकडे, टेबल, मांडू नये. 

३) आपला वैयक्तिक केर,कचरा प्लास्टिक रस्त्यावर टाकू नये, कचरा घंटागाडीतच टाकावा, किंवा कचऱ्याची स्वतंत्रपणे स्वतः विल्हेवाट लावावी भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुकानात भेसळयुक्त कोणतेही अन्नपदार्थ, गुलाल, पिण्याचे पाणी विक्रीस ठेवू नये.

वरील दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे जे दुकानदार नियमाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर शॉप ॲक्टनुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत १९५८ चे कलम ५३ नुसार अन्न भेसळ प्रतिबंधक ॲक्टनुसार कडक कारवाई करून लायसन्स व ना हरकत दाखला रद्द करण्यात येईल असा जहरी इशारा राशिन ग्रामपंचायत प्रशासक/ ग्रामविकास अधिकारी यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker