google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कोपर्डी घटनेच्या ठिकाणी उच्च न्यायालयाची पाहणी; न्यायमूर्तींच्या पथकाकडून घटनास्थळाची सविस्तर पाहणी

Samrudhakarjat
5 1 0 6 6 9

कर्जत : मौजे कोपर्डी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे सन २०१६ मध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) घटनास्थळी भेट देत पाहणी केली. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी उच्च न्यायालयाच्या स्टाफसह कोपर्डी येथे जाऊन घटनास्थळाची सविस्तर पाहणी केली.

या पाहणीवेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, एस.पी. गवारे, तळका उपअधीक्षक भूमी अभिलेख कर्जतच्या श्रीमती शिल्पा जावक तसेच भूमी अभिलेख विभागाचे श्रीराम बोऱ्हाडे यांच्यासह इतर पदाधिकारी, पंच व साक्षीदार उपस्थित होते.

घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित बाबींची माहिती घेण्यात आल्याने कोपर्डी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker