google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जतच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Samrudhakarjat
5 0 8 4 4 6

 

कर्जत : कर्जत शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवावीत, या मागणीसाठी सौ. स्वाती शशिकांत बोंगाने यांचे दि. 28 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे.

कर्जत शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले असून शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रश्नावर यापूर्वीही प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. दि. 20 जुलै 2026 रोजी कर्जतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच दि. 27 जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर काही अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही नमूद आहे.

यानंतर दि. 1 ऑगस्ट रोजी उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, अपेक्षित स्वरूपात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली नसल्याचा आरोप करत पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

दि. 28 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, अतिक्रमणांवर कायदेशीर व प्रभावी कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. कर्जत नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

शहरातील सर्व अनधिकृत अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने हटवावीत, रस्ते नागरिकांसाठी खुले करावेत आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाची प्रशासन कितपत दखल घेते आणि अतिक्रमणांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होते, याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker