भाजपा युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी साईराज शिंदे; चापडगावच्या युवकाला संघटनेत संधी

कर्जत : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा संघटन सरचिटणीस शेखर खरमरे यांच्या उपस्थितीत युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.

या कार्यकारिणीत चापडगाव येथील साईराज प्रकाश काका शिंदे यांची भाजपा तालुका युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील युवकांना संघटित करून पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना युवकांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर युवा मोर्चाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविणे, शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच आगामी काळात बूथस्तरापासून संघटना मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
साईराज शिंदे यांच्या निवडीमुळे चापडगावसह कर्जत तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या माध्यमातून युवकांच्या विविध प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.




