google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्ष्याला जीवदान; कर्जतमधील तरुणांची तत्परता!

Samrudhakarjat
5 0 7 2 0 2

कर्जत (प्रतिनिधी) : भणगे गल्ली परिसरात पतंगाच्या तुटलेल्या मांज्यात अडकलेल्या पक्ष्याची वेळीच सुटका करण्यात आली. पक्षी मांज्यात अडकून असहाय अवस्थेत असल्याची माहिती मिळताच  सागर शिरसागर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पक्ष्याला सुरक्षितपणे खाली उतरवले.

यानंतर सागर शिरसागर यांनी पक्ष्यावर प्राथमिक उपचार करून त्याची काळजी घेतली. पुढील उपचार व सुरक्षिततेसाठी हा पक्षी वनसेवक ऋषिकेश लोखंडे आणि वनरक्षक चित्रा मॅडम यांच्या माध्यमातून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.

पतंगाच्या मांज्यामुळे पक्ष्यांसह इतर जीवांना गंभीर इजा होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी मांजा रस्त्यावर, झाडांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. तसेच जखमी अथवा मांज्यात अडकलेला पक्षी आढळल्यास तातडीने पक्षीप्रेमी किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळीच मदत मिळाल्याने एका मुक्या जीवाचे प्राण वाचविण्यात आले असून, सोनू लोंढे, सागर शिरसागर तसेच वनविभागाचे वनसेवक ऋषिकेश लोखंडे व वनरक्षक चित्रा मॅडम यांच्या संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker