google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

साई आयकॉन बिझनेस सेंटरच्या जागेचा वाटपाचा दावा न्यायालयाने फेटाळला

Samrudhakarjat
5 0 7 5 9 0

कर्जत : कर्जत शहरातील गट नंबर ७८८ व मिळकत नंबर ४०२० येथील सुप्रसिद्ध साई सृष्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित साई आयकॉन बिझनेस सेंटरच्या जागेसंदर्भात दाखल करण्यात आलेला वाटपाचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कर्जत, मा. सौ. आर. आर. काळे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

सदर प्रकरणात प्रतिवादी क्रमांक ३, ४, ७ व ८ अर्थात मूळ मालकांच्या वतीने ॲड. सुनील बबनराव भागवत यांनी कायदेशीर बाजू मांडली. त्यांना ॲड. वैभव सुनील भागवत, ॲड. सोनाली आर. काकडे व ॲड. अभिषेक लेंडकर यांनी सहकार्य केले.

तसेच साई सृष्टी डेव्हलपर्स, प्रतिवादी क्रमांक ९ यांच्या वतीने ॲड. बाळासाहेब बागल यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. रोहन बाळासाहेब बागल यांनी सहकार्य केले.

पक्षकारांच्या वतीने मांडण्यात आलेली कायदेशीर बाजू, सादर करण्यात आलेली कागदपत्रे तसेच उपलब्ध अभिलेखांचा विचार करून न्यायालयाने सदर वाटपाचा दावा फेटाळण्याचा निर्णय दिला.

या निर्णयामुळे कर्जत शहरातील साई आयकॉन बिझनेस सेंटरच्या जागेसंदर्भात दाखल झालेल्या वाटपाच्या दाव्यावर न्यायालयीन पातळीवर महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker