google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

बापूसाहेब देशमुख सहकारी सोसायटीकडून सभासदांना १५% लाभांश जाहीर; चेअरमन विक्रम देशमुख यांची घोषणा

Samrudhakarjat
5 0 6 9 2 9

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी):

बापूसाहेब देशमुख विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. राशीन (ता. कर्जत) यांची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता संस्थेच्या सहकार भवन कार्यालयात उत्साहात पार पडली. चालू वर्षात सर्वत्र पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती असतानाही, सोसायटीने सभासदांच्या हिताचा विचार करत तब्बल १५% लाभांश (डिव्हिडंड) देणार असल्याची महत्त्वाची घोषणा सोसायटीचे चेअरमन विक्रम देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात केली.

सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर चेअरमन विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सोसायटीचे सचिव अतुल कानगुडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले व संस्थेचा वार्षिक ताळेबंद तसेच आर्थिक लेखाजोखा सभासदांपुढे मांडला.

व्यासपीठावरून बोलताना चेअरमन विक्रम देशमुख यांनी स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिकूल आणि दुष्काळी परिस्थितीतही संस्थेने नियोजनबद्ध कारभार करत सभासदांना १५% लाभांश देण्याची परंपरा कायम राखल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संस्थेच्या हितार्थ दादासाहेब कानगुडे, जनार्धन मोढळे, मधुकर दंडे पाटील, गौतम कानगुडे व शिवदास शेटे यांनी आपली मनोगते व्यक्त करून संस्थेच्या यशस्वी कारभाराचे कौतुक केले.

या सर्वसाधारण सभेस जनार्धन मोढळे, बापूराव जगताप, भाऊसाहेब सागडे, वैभव काळे यांसह सोसायटीचे सर्व संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी संजय काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker