google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

श्री अमरनाथ विद्यालयात पाचवीपासून फाउंडेशन कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

Samrudhakarjat
4 8 5 0 3 6

कर्जत, प्रतिनिधी : यशवंत शिक्षण संस्थेच्या श्री अमरनाथ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत येथे दि. १ जून २०२६ पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विशेष फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमास विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या फाउंडेशन कोर्सअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे नियमित अध्यापन तज्ज्ञ शिक्षकांमार्फत केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किक विचारशक्ती व स्पर्धात्मक क्षमता विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याशिवाय नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षा आदी स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र अतिरिक्त तासांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन आपल्या गावातच उपलब्ध होत आहे.

दहावी व बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर स्पर्धात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेला पाया भक्कम करण्याच्या उद्देशाने हा फाउंडेशन कोर्स राबविण्यात येत आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागत होते. मात्र आता कर्जतमध्येच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे, कर्जत तालुक्यात पाचवीपासून अशा स्वरूपाचा फाउंडेशन कोर्स सुरू करणारे श्री अमरनाथ विद्यालय हे पहिले विद्यालय ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालयाने उचललेले हे पाऊल शैक्षणिक क्षेत्रात निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा विद्यालयाचा मानस आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker