google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राशीनच्या विकी साळवे यांचे घवघवीत यश; ‘एलएलबी’ परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण!

Samrudhakarjat
4 8 3 2 2 9

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी) : – कर्जत तालुक्यातील राशीन येथील रहिवासी विकी उर्फ स्वप्नील रामकृष्ण साळवे यांनी आपल्या कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एलएलबी (L.L.B) परीक्षेत प्रथम (A) श्रेणीत उत्तीर्ण होऊन ‘वकील’ ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे राशीन शहर व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शिक्षणाचा खडतर आणि बहुआयामी प्रवासविकी साळवे यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण राशीन येथील नामांकित श्री जगदंबा विद्यालयात पूर्ण केले.

त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर (Post Graduation) शिक्षण पूर्ण केले. विकी यांनी केवळ एलएलबीवरच न थांबता इतिहास व शिक्षणशास्त्र या दोन्ही विषयात मास्टर डिग्री (M.A.) देखील संपादन केली आहे.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि वकिलीचे शिक्षणस्पर्धा परीक्षेचे केंद्र असलेल्या पुणे शहरात राहून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास केला व अनेक परीक्षा दिल्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच त्यांनी ॲड. बी. डी. हंबर्डे विधी महाविद्यालयातून आपले एलएलबीचे शिक्षण अत्यंत उत्कृष्ट गुणांनी पूर्ण केले.आई-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि खडतर प्रवास करत विकी यांनी हे यश संपादन केले आहे.

आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी आई-वडिलांचे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्ष साकार स्वप्नपूर्ती करून दाखवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल राशीन परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केले जात असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker