pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

‘मुशाफिरी यात्रा’ भटके विमुक्त समाजाचे वास्तव मांडत आहे – ॲड.डॉ.अरुण जाधव

78 वर्षानंतर भटके विमुक्त समाजाला मेल्यावर पुरायला व जाळायला जागा नाही

Samrudhakarjat
4 8 0 1 5 2

(कर्जत प्रतिनिधी) :- संपूर्ण राज्यात व देशात चर्चेचा विषय ठरलेली मुसाफिरी यात्रा भटके-विमुक्त आदिवासी समाजाची घरगणना व जनगणना प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.ही जनजागृती करण्यासाठी ही यात्रा उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागातून भटके विमुक्त समाजाचे नेते ॲड.डॉ.अरुण(आबा)जाधव नगरसेवक जामखेड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

       आज या मुसाफिरी यात्रेचा दुसरा दिवस आहे. ही यात्रा कर्जत तालुक्यातील माहिजळगाव,पाटेवाडी, हंडाळवाडी,कर्जत शहर,भांडेवाडी,राशीन, बाभुळगाव दुमाला, पिंपळवाडी व कुळधरण या ठिकाणी भटके विमुक्त व आदिवासी समाजाच्या पालावर, तांड्यावर, छपरामध्ये तसेच माती शेणाच्या कुडामध्ये पोहोचली.

       आज देशात सरकारतर्फे घरगणना व जनगणना मोहीम चालू आहे. ही घरगणना व जनगणना १ मे पासून ते १४ जून पर्यंत चालू आहे. जि‌.प.शाळेचे शिक्षक प्रत्येक गावात जाऊन तेथील लोकांची घरगणना व जनगणना करतात.परंतु गावाबाहेर,डोंगरात,जंगलात,कुडात,पालात राहणाऱ्या भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना होत नाही, ही या समाजासाठी व देशासाठी खूप चिंतेची बाब आहे.

        ही यात्रा माहिजळगाव येथे उपजीविकेसाठी आलेला नाथपंथी डवरी गोसावी व वडार तेलंगणा राज्यातून उपजीविकेसाठी आलेले व काही भटके समाजाचे पाल या ठिकाणी थांबली या ठिकाणी जवळपास 160 पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होता.या उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव यांनी तुमच्याकडे सरकारी कर्मचारी घरगणना व जनगणना करण्यासाठी आले होते का? असे विचारले असता त्यांनी आमच्याकडे कोणीही आले नाही. व आमची कोणत्याच प्रकारची घरगणना व जनगणना केली नाही.हा समाज या ठिकाणी मागील 6 महिन्यापासून पालामध्ये राहत आहे. परंतु शासनाच्या कोणत्याही योजनांचा या समाजाला लाभ मिळत नाही. परिणामी हा समाज पोटासाठी अजूनही भटकंतीच करत आहेत.जर या समाजाची घरगणना जनगणना झाली नाही. तर पुढच्या पिढीचे यापेक्षा अजून अतोनात हाल होतील. व भविष्यात या समाजाला *भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी खूप समस्यांना सामोर जावे लागेल म्हणून या समाजाची घरगणना व जनगणना होणे अपेक्षित आहे.

          ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिवा श्रीम उमाताई जाधव यांनी महिलांशी संवाद साधताना त्यांना असे दिसून आले की, भटकंतीमुळे या महिलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही. म्हणून सरकारने या समाजाचे घरगणना व जनगणना तर करावीच परंतु यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या चांगल्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच महिलांच्या आरोग्याविषयी लक्ष द्यावे. असे त्यांनी सरकारकडे मत मांडले.

        ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक श्री.बापूसाहेब ओहोळ यांनी आपल्या मनोगतातून मत मांडताना सांगितले की, जर भटक्या विमुक्त समाजाचे घरगणना व जनगणना झाली नाही. व SIR व NRC सारखे नियम देशात लागू झाले तर, भविष्यात या समाजाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. व हे सिद्ध न झाल्यास त्याचा परिणाम म्हणून देशाचे नागरिक असतानाही सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांना देश सोडून जावे लागेल.

       *बाभुळगाव येथील सरपंच श्री.अमोल चव्हाण* यांनी सभेला मार्गदर्शन करताना सांगितले की या गावातील भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना स्वतः शासकीय यंत्रणेला मदत करून पूर्णपणे करून घेईल. तसेच या भटके विमुक्त समाजाला गावामध्ये त्यांना घरकुल,शिक्षण,आरोग्य तसेच शासकीय योजनाचा पूर्णपणे लाभ देण्यात येईल. असे मत मांडले व या सर्वांची घरगणना व जनगणना शंभर टक्के पूर्ण करून घेईल असे आश्वासन दिले.तसेच या मुशाफिरी यात्रेचे त्यांनी आभार मांडले.कारण हे काम सरकारचे आहे परंतु सरकार या समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे.परंतु ॲड.डॉ.अरुण(आबा) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज भटके विमुक्त समाजाला या मुसाफिरी यात्रेमुळे न्याय मिळेल असा 

 त्यांना विश्वास व्यक्त केला. पुढे ही यात्रा हंडाळवाडी,राशीन,पिंपळवाडी,कुळधरण ठिकाणी पोहोचली या सर्व ठिकाणी शेकडोच्या संख्येने भटके विमुक्त समाज उपस्थित होता.यामध्ये डवरी गोसावी,वडार, भिल्ल,पारधी, कैकाडी,तिरमली,मरीआई वाले तसेच इतर भटकंती करणारा समाज उपस्थित होता.यावेळी या समूहाला तुकाराम पवार,शितलताई पवार ,ललिताताई पवार,राहुल पवार,रेश्मा ताई बागवान,ऋषी गायकवाड,चंपाताई पवार,काजूरी पवार,उत्तम सावंत, नवनाथ शिंदे, यांनी आपली भाषणे केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष चव्हाण यांनी केले तसेच त्यांनी आपल्या भाषणातून घरगणना व जनगणना करून घेणे किती महत्त्वाचे आहे. हे सांगितले. यावेळी दिसेना पवार, रंगीशा काळे, पार्वतीताई भोसले, वैभव काळे सावकार भोसले, आतिश पवार, बापू काळे, सुनील काळे, दिनेश काळे व अविनाश काळे हेही उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार तुकाराम शिंदे सर यांनी मांडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker