pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

फक्राबाद दरोडा उघडकीस; राशीनमधून आरोपी जेरबंद!

जबरी मारहाण करून १.९० लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन विधीसंघर्षित बालकांसह तिघे ताब्यात

Samrudhakarjat
4 8 0 4 1 3

(कर्जत | प्रतिनिधी) :- जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे ३१ मे रोजी मध्यरात्री झालेल्या जबरी दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यात जामखेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राशीन येथून मुख्य संशयितासह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

फक्राबाद येथे ३१ मेच्या मध्यरात्री कौशल्या आण्णासाहेब आढाव, मैनाबाई पारे आणि भाऊ अंगद आढाव हे घराच्या अंगणात झोपलेले असताना ३ ते ४ अनोळखी दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून घरात प्रवेश केला. कोयता, गज आणि काठ्यांच्या सहाय्याने त्यांनी कुटुंबीयांवर हल्ला चढवला. बचावासाठी आलेल्या महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

यानंतर दरोडेखोरांनी घरातील सामानाची उचकापाचक करून फिर्यादी, तिची बहीण आणि आई यांच्या अंगावरील सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांचा मोबाईल आणि ४० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पलायन केले होते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यात राशीन येथील कुणाल राजू भोसले व त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे व त्यांच्या पथकाने कर्जत पोलिसांच्या मदतीने राशीन येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत आरोपींनी इतर ४ ते ५ साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे करीत आहेत.

दरोड्याने हादरलेल्या फक्राबादला दिलासा फक्राबाद येथील दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अवघ्या काही दिवसांत आरोपींना जेरबंद करण्यात जामखेड पोलिसांना मिळालेल्या यशामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker