(राशीन प्रतिनिधी) :- आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या राशीन ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागांसाठीची आरक्षण सोडत आज विशेष ग्रामसभेत पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण व महिला आरक्षण निश्चित करण्यात आले असून, या प्रक्रियेनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट झाले आहे.
ग्रामसभेत मंडळ अधिकारी विश्वास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रभागनिहाय सदस्य पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार, स्थानिक राजकीय गट आणि ग्रामस्थांमध्ये चर्चांना उधाण आले.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक १ (३ सदस्य) १ सर्वसाधारण व्यक्ती १ नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती १ सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक २ (३ सदस्य) १ अनुसूचित जाती व्यक्ती १ नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती १ सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक ३ (२ सदस्य) १ अनुसूचित जाती व्यक्ती १ सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक ४ (३ सदस्य) १ सर्वसाधारण व्यक्ती १ अनुसूचित जाती स्त्री १ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
प्रभाग क्रमांक ५ (३ सदस्य) १ सर्वसाधारण व्यक्ती १ अनुसूचित जाती स्त्री १ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
प्रभाग क्रमांक ६ (३ सदस्य) १ सर्वसाधारण व्यक्ती २ सर्वसाधारण स्त्री
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे, तलाठी अतुल सुपेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

