राशीन मध्ये वैभव ज्वेलर्स सराफ दुकानदारास फोन पे च्या नावाखाली ५४ हजाराची लुट आरोपी दागिने घेऊन फरार.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- राशीन येथे राशीन सिद्धटेक मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत वैभव ज्वेलर्स अँड सराफ या सोन्याच्या दुकानात आज सायंकाळी सुमारे ५.३० वा. च्या सुमारास एक व्यक्ती सोन्याची अंगठी व काही मनी घेण्यासाठी दुकानांमध्ये दाखल झाला व त्या व्यक्तीने एकूण ५४ हजार रुपये किमतीचे सोने खरेदी केले. वस्तू खरेदी केल्यानंतर फोन पे द्वारे स्कॅन करून रक्कम संपूर्ण रक्कम दुकानदाराच्या अकाउंट वर सोडण्यात आले. फोन पे केलेले पेमेंट दुकानदाराच्या अकाउंट वर जमा झाले नाही हे त्या दुकानदारास सुमारे पंधरा मिनिटे उलटून गेल्यावर कळाले तोपर्यंत सदर व्यक्ती सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला होता. सदर व्यक्तीने बिल करताना डॉक्टर पाटील असे नाव सांगितले असल्याची माहिती वैभव ज्वेलर्स अँड सराफ चे मालक वैभव कुलथे व मुलगा विकी कुलथे यांनी सांगितले. सदर व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून पुढील तपास चालू असल्याची माहिती वैभव कुलथे व विकी कुलथे यांनी सांगितली.



