उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचा विक्रम! विधान परिषदेत पाचव्यांदा बिनविरोध निवड
शिवसेना महिला आघाडीचा सन्मान सोहळा; डॉ. शबनम इनामदार यांची सक्रिय भूमिका


महिला हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या आणि चळवळीच्या मातीतून घडलेल्या उपसभापती विधान परिषद, शिवसेना डॉ नीलमताई गोऱ्हे नीलम ताई गोऱ्हे यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. विधान परिषद सदस्यपदी तब्बल पाचव्यांदा बिनविरोध निवड होण्याचा मान मिळवत त्यांनी आपल्या नेतृत्वाची ताकद अधोरेखित केली आहे.
अहिल्यानगर दक्षिणमध्ये महिलांसाठी आक्रमकपणे काम करणाऱ्या डॉ. शबनम इनामदार यांना नीलम ताईंचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. या पाठबळामुळेच महिला आघाडी अधिक सक्षम होत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या अभूतपूर्व यशानिमित्त शिवसेना महाराष्ट्र महिला आघाडीच्या वतीने विधान परिषदेत त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरण, न्याय आणि संघटन यासाठी आयुष्य वेचणाऱ्या नीलम ताईंच्या कार्याची ही एक प्रकारे दखलच मानली जात आहे.
या सन्मान सोहळ्याला विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांच्यासह अहिल्यानगर दक्षिणच्या महिला जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार उपस्थित होत्या. राज्यभरातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रसंगी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
नीलम ताईंच्या या यशाबद्दल शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, महिलांच्या लढ्याला नवी दिशा देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.



