कर्जत पोलीस ठाण्यात अत्याधुनिक दंगल नियंत्रण वाहन दाखल


कर्जत /प्रतिनिधी दि. ०१ बदलत्या काळानुसार पोलीस खात्यात ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. अत्याधुनिक तपास यंत्रणेसह अत्याधुनिक वाहने पोलीस खात्यात दाखल झालेली असून आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या वाहनांची मोठ्या प्रमाणावर मदत होईल. असे कर्जत येथील पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले आहे.
एक मे महाराष्ट्र दिन रोजी कर्जत पोलीस ठाण्यात दंगल नियंत्रक अत्याधुनिक पोलीस वाहन उपलब्ध झाले आहे. यावेळी पोलीस उपाधीक्षक लोखंडे हे बोलत होते. यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, बाळासाहेब मुळीक,गुप्त वार्ता विभागाचे पोलीस अंमलदार दीपक कोल्हे, यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार, होमगार्ड उपस्थित होते.

पोलीस विभागाच्या वतीने दंगल नियंत्रण व कायदा व सुव्यस्त राखणे कामी या अत्याधुनिक वाहनाची मोठी मदत होणार असल्याचे समजते. या वाहनावर चारी बाजूने संरक्षक जाळी सह मोठे प्रकाशझोत असणारी यंत्रणा उपलब्ध असून लांब पल्ल्याची अत्याधुनिक कॅमेरे, वाहनावर स्वयं चलित मनोरा या मनोऱ्यावरून पोलीस कोणत्याही प्रकारच्या गर्दीवर सहज नियंत्रण मिळू शकतील.यासह वाहनाच्या आत पोलिस अंमलदारांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे शस्त्र ठेवण्यासाठी जागा दंगल नियंत्रणासाठी लागणारे साहित्य आधी बाबींचा समावेश असून भविष्यात या वाहनाद्वारे कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिसांना मदत होईल. असे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.




