pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

श्री. जगदंबा विद्यालय, राशीन येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

Samrudhakarjat
4 6 8 0 5 6

(राशीन प्रतिनिधी जावेद काझी):- राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर श्री. जगदंबा विद्यालय, राशीन येथे दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विकास मोढळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाहूराजे राजेभोसले,रामकिसन साळवे, विस्तार अधिकारी नरवडे साहेब, केंद्रप्रमुख माळवदकर साहेब, राजेंद्र राऊत गुरुकुल समन्वयक रविंद्र जगदाळे, यशवंत देशमुख,समृध्द कर्जतचे पत्रकार जावेद काझी,विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश उढाणे,उपप्राचार्य संग्राम राक्षे,पर्यवेक्षक गुलाब बाबर,किशोर कर्पे तसेच परिसरातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.

      या प्रसंगी रयत प्रज्ञाशोध परीक्षेत कर्जत तालुक्यात प्रथम आलेले पार्थ काळे व राजवीर शहाणे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच गुरुकुल प्रकल्पांतर्गत वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.तसेच सेवांतर्गत टीईटी परीक्षा पात्र झालेल्या विद्यालयातील शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

        प्रमुख पाहुणे रविंद्र जगदाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत.” त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून शिक्षक व पालकांच्या योगदानाचे विशेष अभिनंदन केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुल प्रमुख महादू भिसे, सूत्रसंचालन भगवान शिंदे, पल्लवी घोडके यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गुरुकुल प्रकल्प सहाय्यक बिभीषण चव्हाण यांनी केले, तर बक्षीस वितरणाचे नियोजन आरती गांगर्डे व अंजली कावरे यांनी केले.

       कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम घेतले. हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker