pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुक्यातील कृषी कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला छळ?

रात्री उशिरा मेसेज, कारमध्ये बसण्याची बळजबरी; वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Samrudhakarjat
4 6 8 0 5 6

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मानसिक त्रास, अवमानास्पद वागणूक तसेच कार्यालयाबाहेर भेटण्याचा दबाव टाकल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत राज्य कृषी विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सदर महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात लेखी तक्रार देत रात्री उशिरा मोबाईलवर अनावश्यक मेसेज पाठविणे, खासगी कारमध्ये बसण्याची जबरदस्ती करणे आणि कार्यालयीन कामकाजात मुद्दाम अडथळे निर्माण करणे अशा प्रकारचा छळ होत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भातील तक्रारीचे निवेदन राज्य महिला आयोगाकडेही पाठविण्यात आले असल्याचे समजते.

पदोन्नतीनंतर माळशिरस येथील रिक्त जागेवर बदली देण्याची विनंती विभागीय कृषी संचालकांकडे करण्यात आली होती. मात्र त्याऐवजी संबंधित महिला कर्मचाऱ्याची बदली कर्जत येथे करण्यात आली. येथे पात्रतेनुसार पदस्थापना न देता इतर काम देण्यात आले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय अवाजवी कामाचा ताण देणे आणि वैयक्तिक पातळीवर त्रास देण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वेगळाच हेतू असल्याची शंका देखील महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रार अर्जात व्यक्त केली आहे. या घटनेमुळे सरकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सदर तक्रारीची माहिती प्रतिनिधीकडे प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागातील हे प्रकरण उघडकीस आले असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

मार्च एंडला आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप? दरम्यान, कर्जत कृषी कार्यालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी लेखा विभागात हस्तक्षेप करून स्वतःच बिले तयार करतात आणि ती शिपायामार्फत थेट कोषागार कार्यालयात जमा करतात, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. विभागीय कृषी संचालक कार्यालयातील ‘वरदहस्त’ असल्याचा दबाव टाकून मनमानी कारभार केल्याचाही गंभीर उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

“संबंधित महिला कर्मचाऱ्याने विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.” — नंदकुमार वाणी, तालुका कृषी अधिकारी, कर्जत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker