राशीन येथे महसूल विभाग व वन विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील राशीन येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान उत्साहात पार पडले.
या शिबिरातील ठळक बाबी : उद्देश: शासनाच्या विविध योजना, सेवा आणि माहिती थेट सामान्य नागरिकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.
हस्ते वाटप: तहसीलदार रवी सातवन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती: तहसीलदार रवी सातवन यांच्यासह भाजपा नेते अल्लाउद्दीन काझी, बंडाभाऊ मोढळे, दत्ता गोसावी, विलास नाना काळे, सुनील काळे, माजी सरपंच भीमराव साळवे, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, नायब तहसीलदार, राम कानगुडे, विक्रम राजे, अशोक जंजिरे, प्रवीण आंधळकर, टंक लिपिक इमरान काझी,व इतर मान्यवर उपस्थित होते.

सहभाग: या अभियानात महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि राशीन परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एकाच छताखाली शासकीय कामांचा निपटारा झाल्यामुळे ग्रामस्थांनी ,, शेतकऱ्यांनी,समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक थोरात यांनी केले तर आभार प्रियंका भोर (बेनवडी) यांनी मानले.



