राशिन मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राशीन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक येथे सकाळी पोलिस निरीक्षक श्री शिरसाठ साहेब यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समस्त गावकरी व फुले प्रेमींच्य वतीने अभिवादन करण्यात आले… यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते…
जयंती निमित्त शैक्षणिक उपक्रम राबवत असताना जिल्हा परिषद शाळा राऊत सरोदे वस्ती, मोढळे वस्ती, जाधव वस्ती, बंडू कानगुडे वस्ती इ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच खाऊ चे वाटप करण्यात आले. दुपारी चार नंतर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची भव्य अशी मिरवणूक सोहळा काढण्यात आला.महात्मा फुलेंच्या पुतळ्यास भव्य अशा रथामध्ये ठेवून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक ते संत सावतामाळी नगर राशीन पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ मिरवणूक चालू होती. महापुरुषांच्या जीवनावर आधारित गितांनी राशीन परिसर निनादुन गेला.. यावेळी तरूण कार्यकर्ते यांचा प्रचंड प्रतिसाद होता. मिरवणूक सोहळा संपल्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली…यासाठी सर्व फुले प्रेमी व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती 2026 व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले फौडेशन राशीन चे अनमोल सहकार्य लाभले…मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार… धन्यवाद… डॉ… विलास नामदेव राऊत राशीन ता कर्जत जिल्हा अहिल्यानगर




